Tue, Feb 19, 2019 10:42होमपेज › Satara › तांबे तार चोरणारी टोळी तडीपार

तांबे तार चोरणारी टोळी तडीपार

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:27PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्या बंद पाडून त्यातील तांब्याची तार चोरणार्‍या पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी 3 तालुक्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

कोंडिबा लक्ष्मण शिर्के (वय 36, रा. चिखली ता. सातारा), रवींद्र शंकर यादव (25, रा. मराठवाडी), रमेश किसन मोरे (24, रा. मराठवाडी), गोरखनाथ ऊर्फ आप्पा बापू मिसाळ (42, रा.आवार्डे) व संदेश ऊर्फ चिंग्या तात्याबा सपकाळ (27, रा.सावरघर, ता. पाटण) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित सातारा तालुक्यात ठिकठिकाणी पवनचक्की बंद पाडून त्यातील तांब्याची तार चोरत होते. याप्रकरणी संशयितांवर दोन गुन्हे दाखल असून त्यांच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली आहे. संशयितांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. उलट सर्वसामान्य जनतेस व पवनचक्की परिसरात उपद्रव होत होता. यामुळे संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. दरम्यान, 48 तासात संशयितांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.