Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Satara › लग्‍न समारंभातून वधूचे सुवर्णालंकार लंपास 

लग्‍न समारंभातून वधूचे सुवर्णालंकार लंपास 

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:12PMलोणंद : प्रतिनिधी 

पाडेगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीतील जयदुर्गा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्‍न समारंभात 30 ते 35 वयोगटातील महिलेने सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले.  लग्‍न कार्यालयातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अमोल वाघ (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या लग्‍नातून 1 लाख चोवीस हजार दोनशे पन्‍नास रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने 30 ते 35 वयोगटातील अनोळखी महिलेने केली. चोरी या घटनेची नोंद लोणंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

पांडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील जयदुर्गा मंगल कार्यालयात अमोल वाघ (रा. वीर, ता. पुरंदर)  यांचे लग्‍न होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास लग्नासाठी बनविलेले सोन्याचांदीचे दागिने आजीजवळ ठेवले होते. त्यावेळी आजीशी अनोळखी महिलेने ओळख करण्याचा प्रयत्न केला. हळदीचा कार्यक्रम चालू असताना आजीस तुम्हाला हळदी लावण्यासाठी बोलावले आहे, असे सांगितले. नवरदेवाच्या आई पुष्पा वाघ यांंना आजीने दागिन्याची पिशवी येथे ठेवली आहे लक्ष ठेव,असे सांगून आजी हळद लावण्यास गेली.

ही संधी साधून अनोळखी महिलेने नवरदेवाच्या आईची नजर चुकवून दागिन्यांच्या पिशवीसह पोबारा केला. या पिशवीमध्ये पावणेतीन तोळ्याचे मणी मंगळसूत्र, दोन डोरली असणारे मिनी गंठण, सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, कानातील सोन्याचे टॉप, कानातील साखळीसह तीन ग्रॅम वजनाची  नाकातील नत, एक ग्रॅम वजनाची चांदीची जोडवी व छल्ला असे लग्‍नातील सुवर्णांलकार होते. या घटनेने लग्‍न समारंभात खळबळ उडाली.  या चोरीची फिर्याद नवरदेवाचा भाऊ   राहुल वाघ यांनी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये दिली असून अधिक तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस नाईक मुळीक करत आहेत.

Tags : Satara, Bridal, gold, jewellery, robbed, wedding, ceremony