Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Satara › जाळी तोडून बिबट्या पसार

जाळी तोडून बिबट्या पसार

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:52PM

बुकमार्क करा

मारूल हवेली/ मसूर : वार्ताहर

पाटण तालुक्यातील उरुल - तांबेवाडी मार्गावर एका पोल्ट्री फार्ममध्ये शुक्रवारी रात्री दोन बछड्यासह बिबट्या दिसला. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जाळी लावली होती. मात्र जाळी तोडून बिबट्या बछड्यांसह पसार झाला. दरम्यान, गायकवाडवाडी येथेही एका वन्य प्राण्याने एका शेळीसह दोन बोकड फस्त केले आहेत. येथील दिलीप शिलवंत यांच्या पोल्ट्री फार्मच्या एका शेडमध्ये अचानक एक मादी बिबट्या दोन बछड्यासह निदर्शनास आला.

शेडमध्ये आवाज आल्याने दादासो माने यांनी पाहिले असता एक बिबट्या त्याच्या दोन पिल्लासह दिसला. बिबट्या रिकाम्या शेडमध्ये शोधात फिरत होता. ग्रामस्थांनी बिबट्यासह बछड्यांना कोंडले होते. त्यानंतर माने यांनी त्वरित गावातील लोकांना याबाबत माहिती दिली. वन समितीचे अध्यक्ष दयानंद शिलवंत यांनी मल्हारपेठ वनाधिकारी रामदास घावटे यांना संपर्क साधला असता तातडीने तीन कर्मचा-यांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मादी बिबट्या बछड्यासोबत असल्यामुळे तिचे रोद्ररुप पाहून उपस्थित ग्रामस्थांची त्रेधा उडाली. गायकवाडवाडी (ता. कराड) येथील संभाजी अर्जुन पवार यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून एका वन्य प्राण्याने हल्‍ला चढवत एक शेळी व दोन बोकड फस्त केले.