Fri, Jul 19, 2019 20:02होमपेज › Satara › खा. उदयनराजे यांच्याकडून रिमांड होममध्ये ब्लँकेट वाटप

खा. उदयनराजे यांच्याकडून रिमांड होममध्ये ब्लँकेट वाटप

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:49PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा पालिकेच्यावतीने रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप  करण्यात आले. यावेळी बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारच्या रिमांड होममधील पोरक्या असलेल्या मुलांना आभाळाची सावली आणि मायेची उब यापुढेही आपण अखंडपणे देऊन आई-वडीलांची उणीव भरून काढू, असे भावोद्गार काढले. 

ब्लँकेट वाटपप्रसंगी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, महिला व बालकल्याण सभापती सविता फाळके, सुनीता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. उदयनराजे हे प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. याचीच प्रचिती आजच्या कार्यक्रमातून आली आहे. यामधून एक वेगळे समाधान लाभले असल्याचे सौ. माधवी कदम यांनी सांगितले. 

खा. उदयनराजेंच्या सूचनानुसार रिमांड होममधील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आल्याचे फाळके यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास नगरसेवक श्रीकांत आंबेकर, ज्ञानेश्‍वर फरांदे, मनोज शेंडे, नगरसेविका सौ. स्नेहा नलवडे, सीता हादगे, राम हादगे व पालिकेच्या भांडार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.