Sun, Apr 21, 2019 06:14होमपेज › Satara › जैविक आणि विषमुक्त शेती काळाची गरज 

जैविक आणि विषमुक्त शेती काळाची गरज 

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 9:53PMरेठरे बुद्रूक : प्रतिनिधी

भेसळ झाल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच जैविक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगत देशात 60 टक्क शेतकरी आहे. मात्र त्यानंतरही त्यांचा वापर केवळ मतांसाठी होतो, हे दुर्दैवी असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले.

रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना कार्यस्थळावर डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानकडून योगगुरू रामदेव बाबा यांचे ‘किसान समृद्वी व विषमुक्त शेती’ याविषयी मार्गदर्शन व योग साधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, विनायक भोसले, जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके, सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.

रामदेव बाबा म्हणाले, कृष्णाने सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतल्यास आपले सर्व सहकार्य राहिल. योगसाधना केल्यास आपण निरोगी व आजार मुक्त राहू शकतो. हे करण्यासाठी पैसे पडत नाहीत आणि डॉक्टरही लागत नाही. कुठे जायचेही नाही. आज आपल्या देशातून विदेशी कंपन्या सुमारे 50 लाख कोटी रूपये घेऊन जात आहेत. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास पैशाबरोबर आरोग्य वाचेल. याशिवाय आरोग्य सदृढ राहील. आपल्या देशावर, मातृभूमीवर करा. त्या मातीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. मी गरीब घरचा मुलगा असून वयाच्या 9 वर्षापासून योग साधनेला वाहून घेतले आहे. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली कमाई असून गाई, म्हैस, पशुमात्रा, गोधन याचे पालन पोषण करणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात तीस ते पन्नास लिटर दूध देणार्‍या गाईची पैदास करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच माझ्यामुळे शेकडो लोकांची रोगराई बरी होत आहे. पण अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने वाईट वाटणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण मला त्याची फिकीर नाही. मी कोणतेही गैरकाम करत नाही आणि करणार नाही. जर तसे आढळल्यास मी कोणत्याही शिक्षेस पात्र असेन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आपल्या मधुर वाणीने उपस्थित शेतकर्‍यांसह युवा वर्गाला त्यांनी मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ. सुरेश भोसले यांचेही भाषण झाले. डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले.