Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Satara › सातारा : सुरुर-वाईजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सातारा : सुरुर-वाईजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 29 2018 12:00AMओझर्डे : वार्ताहर 

सुरुर-वाई रस्त्यावर भरघाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार  झाला. दुचाकीवरून (एमएच 12 एचएच 4101) गुरू राजू जोसेफ (वय 25, रा. खिंगर, ता. महाबळेश्‍वर) हे रात्री वाईकडे जात असताना त्यांची दुचाकी सुरुर-वाई रस्त्यावर असणार्‍या हॉटेल पवनसमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आली असता, समोरून भरधाव वेगात येणार्‍या कारने विरुद्ध दिशेला येऊन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दहा ते पंधरा फूट उंच उडून कारच्या पुढील काचेवर आदळल्याने तो जागीच ठार झाला.

भुईंज पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविला.