Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Satara › उंब्रज येथील दिंडीत महिलांचा मोठा सहभाग

उंब्रज येथील दिंडीत महिलांचा मोठा सहभाग

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:20PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

जयराम स्वामी वडगांव येथील ह.भ.प. विठ्ठल महाराज हे प्रेरणास्थानी असलेल्या उंब्रज, ता. कराड येथील श्री संतश्रेष्ठ संत सखू आषाढी पालखी पायी वारी दिंडीचे नववे वर्ष सुरू आहे. जवळपास तीनशेच्या आसपास वारकरी सहभागी होणार्‍या या दिंडीत महिलांचा मोठ्या प्रमाणात असणारा सहभाग हे या दिंडीचे वैशिष्टये आहे. 

आळंदी व देहू येथून संत तुकाराम व संत ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात ज्या दिवशी आगमन होते. त्याच दिवशी उंब्रज येथील संत सखू आषाढी पालखी सोहळ्याच्या दिंडी वारीस उंब्रज येथे ज्ञानोबा माऊ ली,  माऊ ली तुकारामच्या जयघोषात प्रारंभ होतो. हे ही या दिंडीचे खास वैशिष्टये सांगितले जाते.

नऊ  वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या दिंडीत केवळ शंभर वारकरी सहभागी झाले होते. त्यानंतर शंभर वरून दीडशे, दोनशे आणि आज रोजी जवळपास तीनशेपेक्षा जास्त वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या दिंंडीत महिला, तरूणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. भैरवनाथ मंडळाचे पदाधिकारी हे या दिंडीचे चालक आहेत. या मंडळाने जवळपास दोन लाख रूपये किंंमतीचा आकर्षक रथ पायी दिंडी वारीसाठी लोकवर्गणीतून साकार केला आहे. 

कराड येथील श्री संत सखू मठातून संत सखू यांच्या पादुका ज्ञानोबा माऊ लीच्या जयघोषात रथातून मिरवणूकीने उंब्रज येथील भैरवनाथ मंदिरात आणल्या जातात. नियोजित वेळेनुसार शिस्तबध्द अशा वारी दिंडी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ होतो. अत्यंत उत्साहात निघालेली वारी दिंडी सोहळा अंतवडी, म्हासुर्णे, मायणी, तरसवाडी घाटात संत सखू मंदिरात दर्शन घेऊन शेणवडी, शेरेवाडी, गार्डीफाटा, वाखरी मार्गे नवमीला पंढरपूर येथे पोहोचते.  

दिंडी मध्ये वारकरी भाविकांना कोणताही त्रास होवू नये याअनुषंगाने दिंडी संयोजकातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जाते. दिंडीतील सर्व वारकरी यांना चहा, नाष्टा, जेवण तसेच मुक्‍कामाच्या ठिकाणी सर्व वारकरी यांची उत्कृष्ट अशी राहण्याची सोय केली जाते. ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्‍काम आहे त्या ठिकाणी दिंडीतील वारकरी यांचे सहित्य घेऊन जाणारी वाहने मुक्‍कामाच्या ठिकाणी दिंडी पोहोचण्यापूर्वीच पोहोचतात. मुक्‍कामाच्या ठिकाणी  वारकर्‍यांचे जेवण, राहणे आदींची सोय केली जाते. तसेच वारी दरम्यान कोणावरही कोणताही बाका प्रसंग आल्यास सर्वजण एकसंघ होऊन त्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडतात.