Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Satara › अत्याचार प्रकरणी युवकावर पोक्सो दाखल

अत्याचार प्रकरणी युवकावर पोक्सो दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहर 

भुईंज परिसरातून काही दिवसांपूर्वी उस तोड मजूराच्या मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी देवीदास प्रल्हाद वाघ (वय 20 वर्षे, रा.उचलकी, ता.जि.औरंगाबाद) याला अटक केली असून त्याच्यावर बाल लैगिंक अत्याचार (पोक्सो) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

भुईंज परिसरात असणार्‍या एका उसतोड मजुराच्या मुलीला देवीदास वाघ याने फूस लावून पळवून नेले होते. वाघ हा गंगापूर, जि. औरंगाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गंगापूर पोलिसांच्या मदतीने भुईंज पोलिसांनी देवीदास वाघ याला अटक करून पीडित मुलीला ताब्यात घेतले. भुईंज पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पीडित मुलीकडे चौकशी केली असता वाघ याने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे सांगितले. त्यानुसार वाघ याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत स.पो.नि.बाळासाहेब भरणे, सहाय्यक फौजदार जगन्नाथ फरांदे व कॉन्स्टेबल सचिन भोसले यांनी सहभाग घेतला होता.


  •