कराड : प्रतिनिधी
भीमा- कोरेगाव येथील दंगलीला जबाबदार असणारे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी,या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शनिवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांंना तात्काळ अटक करावी, दंगलीनंतर दलित तरूण व नागरिकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच दंगलीत नुकसान झालेल्या वाहनांची नुकसान भरपाई मिळावी, खोटे गुन्हे दाखल झाल्याने निरपराध युवकांचे करिअर बरबाद होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. महागाई निर्देशांकानुसार भारत सरकारची शिष्यवृत्त सरसकट पाच लाख रूपये करण्यात यावी व ती सर्व प्रवर्गाला लागू करावी, विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दरमहा 1500 रूपये मिळावा आदी मागण्यांसाठी महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सुभाष किरत म्हणाले, दंगलीतील जबाबदार व्यक्तींना अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करणार आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे, तालुका अध्यक्ष तानाजी बनसोडे, जिल्हा संघटक गणेश भिसे, दादासाहेब कांबळे, कराड उत्तर अध्यक्ष संतोष किरत, दक्षिण अध्यक्ष मिलिंद सावंत, युवक आघाडी अध्यक्ष राहूल मोडके, गौतम बैले, शहाजी किरत, दामोदर खरात, रविंद्र कांबळे, विशाल किवळकर, सागर माने, अरविंद थोरात, तुषार माने, अविनाश मोरे यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.