Mon, Nov 19, 2018 15:50होमपेज › Satara › पाचगणी पोलिस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना

पाचगणी पोलिस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:29PM

बुकमार्क करा

भिलार : वार्ताहर

 ‘आहेस निर्भया तू  
अवतार दुर्गेचा तू 
नको घाबरूस कोणाला 
आम्ही येऊ तुझ्या मदतीला’ 

हे ब्रीदवाक्य घेऊन महिला आणि मुलींची छेडछाड करणार्‍या प्रवृत्तीविरोधात पोलीस ठाण्याच्या वतीने निर्भया पथके  कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकाने सोमवारी पाचगणी येथील जे.पी मेहता ज्युनिअर कॉलेजमध्ये युवक व युवतींशी संवाद साधला. महिला आणि शालेय मुलींच्या छेडछाडीच्या घटना सध्या वाढत असून घडत असणार्‍या या गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी कोल्हापूर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज, मीनलबेन मेहता सीनिअर कॉलेज तसेच महात्मा फुले विद्यामंदिर  या ठिकाणी निर्भया पथकाची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  आजकाल शालेय व महाविद्यालय परिसरात घडत असलेल्या घटना याबाबत जनजागृती केली. छेडछाड किंवा मुलींना त्रास देणारा प्रकार घडल्यास त्वरित याची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले. निर्भया पथकाचा फलक कॉलेज मध्ये लावला असून त्यावर पोलिस ठाण्याचा व संबंधित पोलिसांचे नंबर देण्यात आले आहेत. यावेळी प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.