Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पुस्तकाचं गाव भिलार फुलांनी बहरले

पुस्तकाचं गाव भिलार फुलांनी बहरले

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 11:21PMकुडाळ : प्रतिनिधी 

महाबळेश्‍वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलार परिसरातील शेकडो एकर पठारे व डोंगर माथे विविध रंगी फुलांनी बहरले आहेत. पावसाळी पर्यटनाला येणार्‍या पर्यटकांनाही फुले आकर्षीत करु लागली आहेत. 

श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर फुलांच्या कास नंतर महाबळेश्‍वर, पाचगणी, जावली, पाटण या डोंगरी भागात पावसाळ्याच्या दुसर्‍या टप्यात हिरव्या गार निसर्गात विविध रंगाची रान फुलं बहरु लागतात. अशीच रान फुल भिलार व पाचगणी परिसरातील पठारांवर बहरु लागली आहेत. 

सातारा जिल्ह्यातील जगप्रसिध्द फुलांच्या कास पठार पाठोपाठ महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाचगणी व महाबळेश्‍वर या थंड हवेचे ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक वर्षा सहलीला पर्यटनासाठी येतात. कास पठार येथील फुलांची तर अनेकांना भुरळ पडते. आठवड्याच्या शनिवारी व रविवारी पर्यटनासाठी या परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी होते. 

महाबळेश्‍वर तालुक्यातील पुसतकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या गावाच्या परिसरात मोठ -मोठ्या डोंगर रांगा आहेत. तसेच या परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने या डोंगररांगा आता हिरवाईने नटल्या आहेत. या पठारावर विविध रंगांची रान फुले दिसू लागली आहेत. त्यातील शुभ्र पांढर्‍या रंगाची असणारी फुले पर्यटकांना भुरळ घालू लागली आहेत.  भिलार परिसरात जनू पांढर्‍या रान फुलांचा गालीछाच अंथरला असल्याचे पर्यटकांना वाटत आहे.  आता कास पाठोपाठच भिलारच्या पठारावरही फुलांचा गालीछा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. ही फुले पर्यटकांना आकर्षीत करत असून पर्यटक मनमुराद पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.