होमपेज › Satara › परिपूर्ण शिक्षणासाठी उत्तम पर्याय : विश्‍वकर्मा विद्यापीठ

परिपूर्ण शिक्षणासाठी उत्तम पर्याय : विश्‍वकर्मा विद्यापीठ

Published On: Apr 20 2018 1:19AM | Last Updated: Apr 19 2018 8:29PMसातारा : प्रतिनिधी

पुण्यात शिक्षणासाठी कोठे जायचे व कोणत्या कोर्सला अ‍ॅडमिशन घ्यायचे याबाबत कन्फ्युज असाल तर विद्येच्या माहेरघरात पदवी आणि पदव्युतर शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी विश्‍वकर्मा विद्यापीठामुळे उपलब्ध झाली आहे. दि. 21 एप्रिल रोजी सातारा व कराड येथे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांशी संवाद साधून करिअरचा नवा मार्ग शोधता येईल. त्याचबरोबर विद्यार्थी  व पालकांना त्यांच्या मनातील शंकाचे निरसन करता येणार आहे. 

जागतिकीकरणाच्या युगात करिअरच्या अमर्याद वाटा उपलब्ध झाल्या आहेत, परंतु चांगली दिशा दाखविणारा मार्गदर्शक भेटला तर योग्य मार्ग सापडतो. आजच्या स्पर्धेच्या युगात उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाचा पाया मजबूत असणे महत्वाचे आहे. पदवी आणि पदवीनंतरचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला नवीन वळण देणारे असते. इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात असताना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, कोणती शाखा निवडायची, शिक्षणानंतर नोकरीच्या संधी कोठे आहेत, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थी व पालक  यांना पडतात. बर्‍याच वेळा शिक्षण व करिअरच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचा ठरु शकतो. अशावेळी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हीच गरज ओळखून विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सुवर्णसंधी विश्‍वकर्मा विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. 

सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर बन्सिलाल रामनाथ चॅरिटेबल ट्रस्टने राज्यातील विद्यापीठ म्हणून ‘विश्‍वकर्मा’ विद्यापीठाची स्थापना केली आहे. पारंपरिक ज्ञानापेक्षा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करणे व त्यासाठी लागणार्‍या अभ्यासक्रमाची निर्मिती करणे हे विश्‍वकर्मा विद्यापीठाचे ध्येय आहे. 

1983 साली निर्माण झालेल्या विश्‍वकर्मा इन्स्ट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) आणि त्यानंतर अल्पावधीत स्थापन झालेल्या विश्‍वकर्मा इन्स्ट्यिूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) या दोन्ही संस्थांना शैक्षणिक  स्वायतत्ता मिळाली आहे. 17  शैक्षणिक संस्था, 18 हजार विद्यार्थी आणि जवळपास दीड हजार कर्मचारी वर्ग असणारा शैक्षणिक वटवृक्ष म्हणून ‘विश्‍वकर्मा’ नावारुपाला आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार परिपूर्ण आणि दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत म्हणून ‘विश्‍वकर्मा विद्यापीठ’ कार्यरत आहे. 

विश्‍वकर्मा विद्यापीठात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.टेक., बी.बी.ए., बी.व्होक., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी.,एम.बी.ए., यासह फॅशन अँड अ‍ॅपरल डिझाईन, ग्राफीक डिझाईन अँड मल्टीमिडिया, ट्रॅव्हल अँड टुरिझम, ऑटोमोटिव्ह, बँकिग अँड फायनासियल सर्व्हीसेस, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, रिटेल, टेलकॉम, कॉम्प्युटर, मॅकेनिकल, जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, ब्युटी अँड वेलनस, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, फॉरेन लँग्वेज, लॉ आणि लिबरल आर्ट या विद्याशाखा अंतर्गत 45 हून अधिक अभ्यासक्रमांचे पदवी, पदव्युतर, एम.फिल., पीएच.डी. पातळीवरचे शिक्षण विद्यापीठात दिले जाते.  

सातारा व कराड येथे तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

सातारा येथे शनिवार दि. 21 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 6.30 यावेळेत हॉटेल महाराजा रिजेन्सी, शिवाजी सर्कल, पोवई नाका, सातारा येथे प्रो. डॉ. उमेश पटर्वधन (मो.नं.9067002225), प्रो.आशिष थिटे (मो.नं.9921238958, 7350468195).

हॉटेल पंकज एक्झिक्युटिव्ह, पुणे-बेंगलोर हायवे, नवीन कोयना पुलजवळ, कराड येथे प्रो. राधाकृष्ण बटुले (मो.नं.9067002226) प्रो. विवेक निंबोळकर (मो.नं.9890863122, 9890611130) या पुण्याच्या शिक्षण क्षेत्रातील नामवंत  प्राध्यापकांशी वरील ठिकाणी मोफत संवाद साधता येणार आहेत. मार्गदर्शनाबरोबर विद्यार्थ्यी व पालकांना शैक्षणिक  शंकांचे निरसन करता येणार आहे.