Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Satara › उरमोडी प्रकल्पग्रस्तांचे श्राद्ध आंदोलन मागे

उरमोडी प्रकल्पग्रस्तांचे श्राद्ध आंदोलन मागे

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 9:28PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर 

उरमोडी धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी  उरमोडी धरणाच्या भिंतीवर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, धरणग्रस्तांचा मेळावा होवून त्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे आंदोलन मागे घेतल्याची माहिती देण्यात आली. 

उरमोडी धरणग्रस्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन  पुकारले होते. मात्र, तत्पूर्वी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी अधिक्षक अभियंता विजय  घोगरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रदिप जाधव, उरमोडी कृती समितीचे अध्यक्ष वसंत भंडारे, बबन देवरे  आदी उपस्थित होते.  बैठकीत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले की, 15 जानेवारीपर्यंत अरगडवाडी पुनर्वसित निमसोड गावठाणातील प्‍लॉट वाटप पूर्ण करण्यात येईल. तसेच 30 डिसेंबरपर्यंत ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतून पाण्याचे कॅनॉल गेले आहेत त्या पोट कॅनॉलची (कालव्याची) मोजनी पूर्ण झाली पाहिजे. 

17 जानेवारीला वेणेखोल ते कातवडी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी  तसेच उरमोडी प्रकल्पग्रस्त बाधित जी गावे वर सरकून राहिली आहेत त्या गावांना कोणत्या अडचणी आहेत हे पाहण्यासाठी मी स्वत: येणार असल्याचे  जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत सांगितले.  दरम्यान, धरण भिंतीवर प्रकल्पग्रस्तांचा मेळावा झाला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.