Mon, Mar 25, 2019 18:13होमपेज › Satara › दोघांना मारहाण; मनसे शहराध्यक्षाला अटक

दोघांना मारहाण; मनसे शहराध्यक्षाला अटक

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 11:11PMसातारा : प्रतिनिधी

देगाव येथील दोघांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी मनसेचा शहराध्यक्ष युवराज पवार याला सातारा शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली असून, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गेल्या महिन्यात एमआयडीसी येथील हॉटेल फुलोरासमोर संशयित युवराज पवार याच्यासह त्याच्या साथीदारांनी दोघांना बेदम मारहाण केली होती. रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याने जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिसांनी जखमीची तक्रार घेतल्यानंतर युवराज पवारसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस या घटनेचा तपास करत असताना संशयित युवराज पवार पोलिसांना सापडत नव्हता. सोमवारी त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नानासाहेब कदम यांनी ही कारवाई केली आहे.