Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Satara › मिरची पूड टाकून बॅटने डोके फोडले

मिरची पूड टाकून बॅटने डोके फोडले

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 11 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

काळभैरव मंडळाच्या मुलांनी आरडाओरडा का केला असे विचारल्याच्या कारणातून गणेश शिवाजी गायकवाड (मूळ रा.कटगूण ता.खटाव सध्या रा.वर्णे ता.सातारा) याने इंद्रजीत माणिक पवार (वय 25, रा.वर्णे) याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बॅटने डोके फोडल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी रात्री वर्णे येथे तक्रारदार व त्याचा मित्र काळभैरव मंडळाच्या मुलांनी कालवा का केला? अशी विचारणा केली. त्यावेळी संशयित गणेश गायकवाड याने चिडून जाऊन मिरची पूड टाकून बॅटने डोके फोडले. घटनेनंतर जखमी इंद्रजीत याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून बोरगाव पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.