Wed, Apr 24, 2019 12:14होमपेज › Satara › बसाप्पा पेठेत मटका अड्ड्यावर छापा

बसाप्पा पेठेत मटका अड्ड्यावर छापा

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:48PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील राधिका रस्त्यावरील बसाप्पा पेठेत बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.राधिका रोडवर असणार्‍या बसप्पा पेठेत मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सोमवारी दुपारी दिलीप इरळे यांच्या मालकीच्या बंगल्यात जुगार खेळत असल्याचे दिसले. अचानक पथकातील कर्मचार्‍यांनी जुगार खेळणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दिलीप इरळे (रा. बसाप्पा पेठ), कपिल अग्रवाल (रा. भोसलेनगर), नीलेश कदम (रा. शुक्रवार पेठ), नितीन ओसवाल (रा. बावधन नाका, ता. वाई), गोपाळ धूत (रा. गुलमोहर कॉलनी, ता. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्यामध्ये दोन दुचाकी, 10 मोबाईल, रोकड व जुगाराचे साहित्य असा 2 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला आहे. 

या कारवाईत पोनि सतीश अस्वर, हवालदार राकेश देवकर, विजय देशमुख, संतोष देशमुख, मुस्तफा शेख, मुनीर मुल्‍ला, अमोल साळुंखे, ज्योतिराम पवार, अविनाश चव्हाण, अनिल स्वामी, निलेश गायकवाड, प्रदीप मोहिते यांनी सहभाग घेतला. याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी अभिनंदन केले.

Tags :  Satara, Basappa Peth, raided, Matta, station