Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Satara › मार्च एंन्डींगची काम; सुट्टी दिवशीही बँका सुरूच 

मार्च एंन्डींगची काम; सुट्टी दिवशीही बँका सुरूच 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

गुरूवारपासून सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. मात्र, मार्च एंडीगमुळे सर्व शासकीय व खासगी बँका, विविध शासकीय कार्यालये व संस्था सुट्टीच्या दिवशी आर्थिक वर्षाचा ताळेबदं करण्यासाठी कर्मचार्‍यांची लगीनघाई सुरू होती. 

यावर्षी मार्च एंडचे शेवटचे तीन दिवस महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि शेवटचा शनिवार क्लोजिंग डेट असल्याने यादिवशी कोणतेही व्यवहार होत नाहीत. हे तीन दिवस सुट्टीचे आणि 1 एप्रिलला रविवार आला असल्याने सलग चार दिवस सुट्‌ट्या आहेत. मात्र मार्चएण्डींगच्या कामांचा निपटारा करण्यासाठी कर्मचारी वर्गाला सुट्टी दिवशीही कार्यालयात उपस्थित   राहून रात्रीचा दिवस करत कामकाज करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नोटाबंदीबरोबरच यावर्षी जीएसटी लागू केल्यामुळे बहुतेक संस्थांची या 31 मार्चला कसरत होणार आहे. सर्वत्र आर्थिक वर्षाचा ताळेबंद पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ऑफिस टाइम ड्यूटी असणारा नोकर वर्गही राउंड अ क्लॉक काम करताना दिसत आहे.

सध्या बँका, वित्त संस्था तसेच खाजगी व शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एन्डची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी वसुली मोहिमेचा धडाका लावल्यामुळे हबकलेले थकबाकीदारांनी रांगेत उभे राहून हप्ते भरले असले तरी कार्यालयीन कामकाज अजूनही बाकी आहे. त्यामुळेच संबंधित कार्यालयांतील कर्मचारी  फायलीं  पूर्ण  करण्याच्या कामात गंतलेले दिसत आहेत. गुरुवार, शुक्रवार , शनिवार आणि रविवार अशी सलग चार दिवस सुट्टी येत असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असले तरी संस्थांची आर्थिक ताळेबंदांच्या महिना अखेरच्या कामांचा नि पटारा करण्यासाठी कार्यालयीन कामे सुरुच राहणार आहेत.

बँका व शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही मार्च एंडीग बघून सुट्ट्या न घेण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे कर्मचारी बँकेत हजर राहत आहे. सुट्टीमुळे ग्राहक जरी बँकेत नसले तरी कर्मचारी आप आपले काम करताना दिसत आहे. नेहमीपेक्षा जास्त वेळ हे काम सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मार्च एंडीगमुळे सलग सुट्ट्यांचा उपभोग कर्मचार्‍यांना घेता येेणार नाही. 


Tags : Bank, Holidays, Satara, 31 March, Work Load


  •