Thu, Jan 24, 2019 03:42होमपेज › Satara › कासवर पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन

कासवर पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:35PMबामणोली : वार्ताहर

जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठाराकडे जाणार्‍या  यवतेश्‍वर, अनावळे ते पारंबे फाट्या दरम्यान सकाळी धावण्यासाठी गेलेल्या धावपट्टूंना  7.30 वगजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन झाल्याचे बोलले जात आहे. या जोडीच्या पावलांचे ठसे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पर्यटकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गुरुवारी सकाळी कास रस्त्याला  धावण्यासाठी गेलेल्या धावपट्टूंना पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन झाले. दरम्यान या धावपट्टूंकडे मोबाईल किंवा कॅमेरा नसल्याने त्यांना फोटो काढता आला नाही. मात्र ज्या ठिकाणाहून ही जोडी गेली त्या ठिकाणच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. या ठस्यांचे फोटो गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. वाघाच्या जोडीचे दर्शन झाल्याने पर्यटक व परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
वाघाची जोडीबाबत वनविभागाला माहिती मिळालेली नसल्याने ही जोडी कोणत्या दिशेला गेली हे समजू शकलेले नाही. वाघांची जोडी कोणी पाहीली, व ती कोणत्या दिशेला गेली आहे. ही माहिती संबंधितांनी वनविभागाशी संपर्क साधून मार्गाची व त्या ठिकाणाची माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन जावली वनविभागाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी केले आहे.