Sat, Sep 22, 2018 03:01होमपेज › Satara › राष्ट्रपती पोलिस पदकाने जगदाळे सन्मानित

राष्ट्रपती पोलिस पदकाने जगदाळे सन्मानित

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:47PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस दलातील निवृत्त सहायक फौजदार बाळासाहेब नानासाो जगदाळे यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. जगदाळे हे पोलिस दलात 1980 साली पोलिसशिपाई पदावर रुजू झाले होते. प्रदीर्घ सेवेनंतर ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.