Tue, Jul 16, 2019 22:00होमपेज › Satara › ‘सध्या देशाला मानवता आणि एकतेची गरज’

‘सध्या देशाला मानवता आणि एकतेची गरज’

Published On: Apr 14 2018 10:01AM | Last Updated: Apr 14 2018 10:01AMकराड : प्रतिनिधी 

सध्याची परिस्थिती पाहता देशाला मानवतेची आणि एकतेची गरज असल्याचे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. ते कराड येथील योग चिकित्सा आणि ध्यान शिबाराच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदेव बाबा यांनी योग आणि त्याचे महत्त्व सांगत विदेशी वस्तूंचा वापर टाळत स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा सल्ला दिला.

देशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने जात, धर्म, पंथ विसरुन एकत्र येण्याचे आवाहन बाबा रामेदव यांनी केले. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान कराड, पंतजली योग समिती, महिला पंतजंली योग समिती व भारत स्वाभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योग चिकित्सा व तीन दिवसीय ध्यान शिबिरास प्रारंभ झाला आहे.  

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विजय वाटेगावकर यांच्यासह 10 हजार कराडकरांच्या उपस्थितीत योग शिबिरास प्रारंभ झाला. सकाळी साडेसात वाजेपर्यंत योग आणि त्याचे महत्त्व सांगत रामदेव बाबा यांनी मौलिक मार्गदर्शन केले. 16 एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार असून विद्यार्थ्यांना, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यावर विषमुक्त शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर रविवारी दुपारी चार वाजता शिवाजी स्टेडियमवर महिलांसह मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आले आहे.

Tags : Baba Ramdev, Yoga, Shibir, Karad