Sun, May 19, 2019 14:32
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › बुधला भाजपचा सरपंच तर उंबरमळेत राष्ट्रवादीचा विरोधकांना क्लीन स्वीप 

बुधला भाजपचा सरपंच तर उंबरमळेत राष्ट्रवादीचा विरोधकांना क्लीन स्वीप 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:52PMखटाव : प्रतिनिधी

खटाव तालुक्यातील बहुचर्चित बुध ग्रामपंचायत  सरपंचपदाच्या निवडणुकीत  भाजपने बाजी मारली तर  उंबरमळेत राष्ट्रवादीने सरपंचपदासह सर्वच जागा जिंकत विरोधकांना क्लीन स्वीप दिला. काटेवाडीतही राष्ट्रवादीने सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले.

खटाव तालुक्यातील बुध, उंबरमळे, काटेवाडी आणि विखळे येथील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल बुधवारी वडूज येथील मतमोजणी केंद्रात जाहीर करण्यात आले. बुध ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. भाजपचे महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक अभय राजेघाटगे यांनी 1213 मते मिळवून मोठ्या फरकाने विजय मिळविला. बाळासाहेब इंगळे यांच्या राष्ट्रवादीप्रणीत गटाला सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपने  मोठा धक्का दिला. एकूण 13  पैकी राष्ट्रवादीचे  7 सदस्य निवडून आले. बुध ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी योगेश ठोंबरे, रंजना घाटगे, पोपट जाधव, संगिता जाधव, शशिकांत घाटगे, श्‍वेता बोराटे, लता सूर्यवंशी, समीर सय्यद, गणेश सातपुते, मनीषा कुंभार, विजय खराटे, दिपाली मेळावणे, रेखा घार्गे यांनी विजय मिळविला. 

उंबरमळे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने सरपंचपदासह सदस्यपदाच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिला. सरपंचपदाच्या निवडणुकीत नवनाथ वलेकर यांनी 469 पैकी 349 मते मिळवत  मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. सदस्यपदी राष्ट्रवादीचे मोहन पाटोळे, रेश्मा वलेकर, पोपट वलेकर, ताईबाई वलेकर, सहदेव वलेकर, ऊर्मिला काळे, शेवंता वलेकर यांनी विजय मिळवला. 

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे काकासो जगदाळे यांनी 178 मते मिळवत विजय मिळविला.  विखळे ग्रामपंचायत निवडणुकीत राहूल देशमुख, रेखा जाधव, सखुबाई घार्गे, कविता नामदाल, सचिन जंगम, प्रसाद देशमुख यांनी विजय मिळवला. त्रिमली ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत हणमंत गुरव यांनी बाजी मारली.