Wed, Jul 24, 2019 12:25होमपेज › Satara › भाजपच्या घोषणांचे सोंग जनतेसमोर उघड

भाजपच्या घोषणांचे सोंग जनतेसमोर उघड

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 7:58PMकराड : प्रतिनिधी

लोकांना भुलवण्यासाठी पुकारलेल्या घोषणा व योजनांची फसवेगिरी करणारे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार आहे. त्यांचे विकासाचे सोंग जनतेने ओळखले आहे. कोट्यवधींची कर्जे बुडवणार्‍या उद्योगपतींना हीच मंडळी पाठीशी घालत आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.वहागाव (ता. कराड) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आ. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच शकुंतला पुजारी, आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, प्रतापराव देशमुख, माजी सरपंच पुष्पाताई माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात मी मूलभूत कामे करू शकलो. 108 टोल फ्री रुग्णवाहिका, बाल स्वास्थ्य योजना, राजीव गांधी जीवनदायिनी योजना, साखळी सिमेंट बंधारे या महत्वपूर्ण लोकहिताच्या योजना आणल्या. पण भाजपने केवळ या योजनांची नावे बदलण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही, असा दावाही आ. चव्हाण यांनी केला.यावेळी आ. आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवरांचीही भाषणे झाली. प्रारंभी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आण्णाजी पवार विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्ही पण घरगडी असल्यामुळे चेअरमन झाला का?

अजितराव चिखलीकर यांनी मदनराव मोहिते यांचा नामोल्लेख टाळत तुम्हीपण घरगडी होता म्हणून चेअरमन झाला का? निरव मोदी व छोटा मल्ल्या तुमच्याच घरात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी गटातटाचा विचार न करता प्रत्येक गावात कोट्यवधींचा विकास केला. चार वर्षात आपण किती निधी आणला, हा प्रश्‍न तुम्ही डॉ. अतुल भोसले यांना वहागावमध्ये आल्यानंतर विचारा? असे आवाहनही चिखलीकर यांनी ग्रामस्थांना केले.