Tue, Jun 02, 2020 00:01
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार जिंकेल : सुभाष देशमुख (Video)

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार जिंकेल : सुभाष देशमुख (Video)

Published On: Feb 14 2019 4:24PM | Last Updated: Feb 14 2019 5:00PM
कराड : प्रतिनिधी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक मंत्र्यावर दोन ते चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्याकडे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार शरद पवार अथवा राष्ट्रवादीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्याविरुद्ध  भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवून जिंकेल, असा विश्वास सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सहकारमंत्री देशमुख हे एका कार्यक्रमानिमित्त कराडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांनी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता नामदार देशमुख यांनी भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल, तो आपण मानू असे सांगितले. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नाला त्यांनी बगल देत या विषयाबाबत भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

माझ्‍यावर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी : सुभाषराव देशमुख

आपल्यावर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केल्याचे सूतोवाचही नामदार सुभाषराव देशमुख यांनी यावेळी केले. तसेच शिवसेनेसोबत भाजपची युती होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.