होमपेज › Satara › शूरांच्या पराक्रमाची शिल्पे जपण्यासाठी युवकांची धडपड

शूरांच्या पराक्रमाची शिल्पे जपण्यासाठी युवकांची धडपड

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 10:53PMऔंध : वार्ताहर 

खटाव तालुक्यातील भोसरे गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून या गावात सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पुरातन वाडा व दगडावर कोरलेली वीरपराक्रमी योद्धयांच्या पराक्रमाची शिल्पे आहेत. ही  कलाकृती म्हणजेच वीरंगळी. पण या वीरंगळीकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे त्या भोसरेतील भवानी आईच्या मंदिर परिसरात पडून आहेत.

हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा यासाठी भोसरेतील ‘शिवराजे ग्रुप’चे युवक धडपड करत आहेत. भवानी आईच्या मंदिर परिसरात जवळ जवळ 10  ते 15  वीरंगळी आहेत. भोसरेतील युवकांनी या वीरंगळीची  साफसफाई केली असून नंतर त्या सर्व वीरंगळीना बांबूचे कुंपण घातले आहे. वीरगंळीच्या शेजारी त्या वीरंगळीवर कोणते शिल्प कोरले आहे?  याची माहिती व ते जपण्यासाठीच्या सूचना, असे फलक लावण्यात आले आहेत.