Thu, Apr 25, 2019 13:55होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 10:47PMकुडाळ : प्रतिनिधी

अल्पवयीन बालिकेला तिची अश्‍लील छायाचित्रे असल्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍यास मेढा पोलिसांनी अटक केली आहे. सागर किसन पार्टे (वय 28, रा. आसनी (गाडीतळ), ता. जावली,  जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. 

सागर पार्टे हा गेल्या दोन वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिचे अश्‍लील फोटो असल्याचे सांगत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पार्टे याने 2015 पासून  2017 पर्यंत त्याच्या राहत्या घरात तसेच वरोशी व आंबेघरच्या हद्दीत निर्जन ठिकाणी चार चाकीतून घेऊन जाऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार केले तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देवून गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न केला.

हा प्रकार पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर नातेवाईक व मुलीने मेढा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार मेढा पोलीस ठाण्यात पार्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली आहे. तपास सपोनि जीवन माने करत आहेत.