होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:37PMविडणी : वार्ताहर 

एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मे 2018 मध्ये संशयित दशरथ बबन बनकर (वय 40) याने पीडित मुलीच्या तोंडावर रुमाल टाकून तिला गुंगी आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीस दिली. या भितीमुळे पीडित मुलीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही.

परंतु कालांतराने अल्पवयीन मुलीस त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील लोकांनी दि. 4 जुलै 2018 मध्ये एका खाजगी दवाखान्यात तिची तपासणी केल्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजले. पीडित मुलीने घरातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. या  बाबतची फिर्याद पीडित मुलीने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली आहे.   संशयित आरोपी दशरथ बनकर यांस अटक करण्यात आली असून त्यास दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.