Wed, Nov 14, 2018 08:28होमपेज › Satara › सातारा : औषध कार्यालयातील सहाय्‍यक आयुक्त, निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

सातारा : औषध कार्यालयातील सहाय्‍यक आयुक्त, निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Published On: Jul 21 2018 6:59PM | Last Updated: Jul 21 2018 6:59PMसातारा : प्रतिनिधी

तक्रादाराच्या किरकोळ औषध विक्री परवान्याच्या नूतनीकरणासाठी साताऱ्यातील औषध प्रशासन कार्यालयातील सहाय्‍यक आयुक्त विनय दत्तात्रय सुलोचने आणि औषध निरीक्षक सविता भास्कर दातीर यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदारांच्या औषध दुकानाचा परवाना नूतनिकरण करण्यासाठी अर्ज दिला होता. परवाना नूतनीकरण करण्यासाठी सुलोचने आणि दातीर यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.