Sun, Feb 24, 2019 08:34होमपेज › Satara › नायगावला ‘सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी’साठी सहकार्य : खा. पूनम महाजन

नायगावला ‘सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी’साठी सहकार्य : खा. पूनम महाजन

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 10:46PMशिरवळ : वार्ताहर 

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच  सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भाजयुमोच्या अध्यक्षा खा. पुनम महाजन यांनी केले.

नायगाव, ता. खंडाळा येथे शनिवारी खा. महाजन यांनी भेट देवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी  आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केलेल्या युवती व महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर खा. महाजन यांनी महिलांशी संवाद साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अ‍ॅपवर शासकीय माहितीबाबत अथवा आपली तक्रार नोंदवण्याचे सामान्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. समाजसुधारणेची सुरुवात आधी घरापासून होणे गरजेचे असल्याचे खा. पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले.  यावेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, आ. राजू तोडमल, नायगावचे सरपंच निखिल झगडे, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, लक्ष्मणराव शेळके उपस्थित होते.