Tue, Apr 23, 2019 22:38होमपेज › Satara › लाच मागणार्‍या पोलिसावर गुन्हा दाखल

लाच मागणार्‍या पोलिसावर गुन्हा दाखल

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:59PMसातारा : प्रतिनिधी

वाठार पोलिस ठाण्यात तक्रारदारांच्या पत्नी, सासू व मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा समरी अहवाल पाठवण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिसनाईक राजकुमार कुंडलिक जगताप याने 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार यांची पत्नी, सासू व मेहुणे यांच्या विरोधात वाठार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा समरी अहवाल व गुन्ह्यामध्ये मदत करण्याची विनंती तक्रारदार यांनी पो.ना. राजकुमार जगताप यांच्याकडे केली होती. यासाठी जगताप याने तक्रारदारांकडे 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबतची माहिती तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जगताप याने कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस ठाणे देण्यात आले आहे. लाच मागणीसंदर्भात काही तक्रारी असल्यास पोलिस उपाधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.