Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Satara › कौटुंबिक वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला

कौटुंबिक वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला

Published On: Jun 17 2018 1:38AM | Last Updated: Jun 16 2018 11:17PMकराड : प्रतिनिधी 

रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना येथील मुजावर कॉलनीत  जुन्या कौटुंबिक वादातून सशस्त्र मारामारी झाली. यात तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारामारीत तलवार, लोखंडी पाईप, काठी, दगड यांचा वापर झाला. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मन्सूर इस्माईल मुल्ला (रा. गुरुवार पेठ) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून सुलतान अमीर मुल्ला, इर्शाद फिरोज मुल्ला, हर्षद फिरोज मुल्ला, इम्रान अल्ताफ मुल्ला, इर्शाद अस्लम मुल्ला, बबलू अस्लम मुल्ला, सोयेल अमीर मुल्ला, तौफीक दिलावर मुल्ला, अमीर रहिमान हुसेन सर्व रा. मुजावर कॉलनी कराड. मुळ रा. कटापुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारामारीत मन्सूर मुल्ला रा. मुजावर कॉलनी यांच्यासह त्यांचा भाचा जुबेर जहाँगीर आंबेकरी रा. गुरूवार पेठ व मोहसीन खुदबुद्दीन फकीर रा.मुजावर कॉलनी हे जखमी झाले आहेत. पैकी जुबेर आंबेकरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कृष्णा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मन्सूर यांचा मुलगा सद्दाम याने अख्तर रहेमान मुल्ला रा. मुजावर कॉलनी यांची मुलगी तनज्जीला हिच्याशी नऊ महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी तलावर, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मन्सूर मुल्ला यांच्यासह जुबेर व मोहसीन यांच्यावर हल्ला केला. सद्दाम हा तनज्जीला घेऊन मुजावर कॉलनीत नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला असता हा हल्ला झाला. अधिक तपास उपनिरीक्षक एस.बी. खाडे करत आहेत.