कराडमध्ये रंगणार महिलांची अंताक्षरी

Published On: Jun 25 2019 1:37AM | Last Updated: Jun 26 2019 6:44PM
Responsive image


कराड : प्रतिनिधी

विविध उत्सवांच्या निमित्ताने रंगणार्‍या स्पर्धांची परंपरा सोशल मिडियाच्या काळात मागे पडत चालली आहे. ही परंपरा जपण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्‍लबच्या माध्यमातून दि. 30 जून रोजी दु. 3 ते 7 या वेळेत ‘अंताक्षरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नेचर ऑरगॅनिक्स’ हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल), कराड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबकडून महिलांच्या उन्नती, सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘अंताक्षरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  दि. 30 जून रोजी  दु. 3 वाजता कार्यक्रम होणार असून  नावनोंदणी दि. 26 जूनपर्यंत करणे गरजेचे आहे. विजेत्या महिलांना डी. के. बॅग्जकडून आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून तीन महिलांचा एक गट असणार आहे.

अधिक  माहितीसाठी संपर्क 
श्रुती  कुलकर्णी - 8805023653.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक 
ज्या महिलांना गाण्याची आवड आहे, अशा सर्व महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आपल्या गटातील महिलांच्या नावासह नोंदणी करायची असून कस्तुरी सभासदांना फक्त 20 रूपये तर सभासद नसणार्‍या महिलांना प्रत्येकी 100 रूपये प्रवेश फी असणार आहे.