होमपेज › Satara › मांढरदेव विषप्रयोगातील आणखी एकाचा मृत्यू 

मांढरदेव विषप्रयोगातील आणखी एकाचा मृत्यू 

Published On: Aug 13 2017 9:52AM | Last Updated: Aug 13 2017 9:52AM

बुकमार्क करा

बारामती : प्रतिनिधी    

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मांढरदेव येथे झालेल्‍या विषप्रयोग प्रकरणातील आणखी एकाचा मृत्‍यू झाला आहे.  मुक्ताबाई नारायण चव्हाण ( वय, ६५ ) असे मृत्‍यू झालेल्‍या महिलेचे नाव आहे. रविवारी ( दि. १३ ) पहाटे उपचारादरम्यान मुक्ताबाई  यांचा मृत्‍यू झाला.

कौटुंबिक कलहातून आपल्याच कुटुंबातील पाच जणांना देवाचे तीर्थ म्हणून विष देण्याचा प्रकार वाई जवळील मांढरदेव येथे २६ जुलै रोजी घडला होता. यात स्वप्निल विष्णू चव्हाण याचा मृत्‍यू झाला होता. या प्रकरणी वाई पोलिसांनी विष्णू नारायण चव्हाण याला २७ जुलै रोजीच अटक केली आहे. तो सध्या सातारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

विष्णू याने कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणीमुळे कुटुंबातील आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली यांना विष दिले होते. त्याची पत्नी आणि दोन मुलींवर अद्यापही सातारा येथे उपचार सुरु आहेत.