होमपेज › Satara › दै. ‘पुढारी’च्या फलटण संपर्क कार्यालयाचा आज वर्धापनदिन

दै. ‘पुढारी’च्या फलटण संपर्क कार्यालयाचा आज वर्धापनदिन

Published On: Jun 01 2018 2:14AM | Last Updated: Jun 01 2018 1:10AMफलटण : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील प्रचंड खपाचे व निःपक्ष, निर्भीड दैनिक असलेल्या  दै.‘पुढारी’च्या फलटण संपर्क  कार्यालयाचा द्वितीय वर्धापनदिन शुक्रवार दि. 1 जून 2018 रोजी साजरा होत आहे.
 प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत  फलटण तालुक्यातील प्रत्येक घराघरात पुढारी पोहोचला असून     फलटण येथील नवीन जागेत शंकरमार्केट येथे  शुभारंभ झाल्यानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग जगतातील सर्वात पहिली बातमी देणार्‍या या दैनिकाला फलटण करांची पहिली पसंती आहे. शहरासह ग्रामीण भागात एक विश्‍वसनिय दैनिक म्हणून पुढारी ओळखला जातो.तशीच जनतेची भावना आहे.

दरम्यान दै. पुढारीच्या फलटण   येथील संपर्क कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन  शुक्रवार दि. 1 जून रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत होणार आहे.  ‘पुढारी’ कार पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव यांच्या प्रेरणेने अमृतमहोत्सवी असणारे हे दैनिक जिल्ह्यासह फलटण तालुक्यात नं. 1 चे दैनिक म्हणून नावारूपास आले आहे. 

वाचकांच्या मनामनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेले दैनिक म्हणून पुढारीची ओळख आहे.  वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देतानाच पुढारी कार्यालयास  शुुभेच्छा देण्यासाठी येणार्‍या वाचकांना एक झाड भेट म्हणून देण्यात येणार आहे. वर्धापनदिनासाठी हार बुके आणू नयेत, आपली सदिच्छा भेट आम्हाला सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती देईल, असे आवाहन फलटण संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

वर्धापन दिन सोहळ्यास दै. ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे, मार्केटिंग मॅनेजर नितीन निकम उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे, स. रा. मोहिते, योगेश निकाळजे, रोहित सोनवलकर यांनी केले आहे.