Wed, May 22, 2019 16:31होमपेज › Satara › आ.आनंदराव पाटील यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळावर निवड

आ.आनंदराव पाटील यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळावर निवड

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 8:39PMकराड : प्रतिनिधी

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळावर निवड झाली आहे.  

शांतता व समृध्दी, प्रतिष्ठा, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रत्येक राष्ट्राच्या समाज जीवनात आवश्यक असलेल्या निष्ठा आदी बाबतीत सर्व राष्ट्रांना एकत्रित बांधून ठेवणारी ही संस्था महत्त्वाची दुवा आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघ व या खालोखाल राष्ट्रकुल संसदीय संघटना ही एक मोठी जागतिक राष्ट्र संघटना म्हणून ओळखली जाते.  

ही संस्था राष्ट्राच्या सामाजिक, राजकिय व आर्थिक  समस्येवर विचारविनीमय करुन परस्पर सहकार्य करणेचे धोरण अंगीकारले जाते. या संस्थेचे मुख्य कार्यालय लंडन (यु.के) येथे आहे. या संसदीय मंडळावर आ.पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे अनेक मान्यवर, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अभिनंदन केले. त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्‍त केल्या.