Mon, Oct 21, 2019 02:52होमपेज › Satara › नागठाणे येथे चोरट्या दारु विक्रीवर छापा

नागठाणे येथे चोरट्या दारु विक्रीवर छापा

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:35PMवेणेगाव : वार्ताहर 

नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत महामार्गालगत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे छापा टाकून पोलिसांनी स्विफ्ट कारमधील रॉयल चॉईसचे 180 मिलीचे 14 खाकी पुठ्याचे बॉक्स अशा 48 प्लास्टिकच्या सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, तडीपार असतानादेखील अमीर गुलाब मुलाणी रा.देशमुखनगर ता.सातारा यांनी स्व:मालकीच्या स्विफ्ट कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करण्यासाठी हस्तकाचा वापर केल्याचे बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले. याप्रकरणी स्विफ्ट कार चालक देवदास नागु पवार  (वय 38, रा. येतगाव, ता.कडेगाव जि. सागंली सध्या रा.शकिला गुलाब मुलाणी रा. देशमुखनगर यांच्या घरी) व अमीर मुलाणी यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेआठ वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे नागठाणेसह परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍यांना चाप बसला आहे. 

सपोनि संतोष चौधरी व नानासाहेब कदम यांना मिळालेल्या गोपीनिय माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. बी. यादव तपास करत आहेत.  
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19