Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Satara › शंभर टक्के अंध असणारा अजिंक्य पवार नेट परीक्षा उत्तीर्ण

शंभर टक्के अंध असणारा अजिंक्य पवार नेट परीक्षा उत्तीर्ण

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 8:55PMवाई : प्रतिनिधी

किसनवीर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी अजिंक्य पवार हा नुकत्याच पार पडलेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण होवून जे.आर.एफ.(ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) व सहायक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरला आहे. दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के अंध असणार्‍या या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात आपले करिअर घडवले आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड येथे पूर्ण केले तर एम.ए. पदव्युतर शिक्षण किसनवीर महाविद्यालयात प्रथम श्रेणीत पूर्ण केले. जावली तालुक्यातील दुर्गम वालुथ गावाचा तो रहिवाशी असून आपले शिक्षण जिद्द, चिकाटी व खडतर परिश्रम घेवून पूर्ण केले.

केवळ स्पर्श ज्ञानाने तो आपला वर्ग हुडकून काढत असे. कॉलेज सुटल्यानंतर तो काठीच्या सहायाने वाई एस.टी. बसस्थानकापर्यंत चालत जात असे. या परीक्षेसाठी मराठी विभागाचे डॉ. रामचंद्र यादव, डॉ. चंद्रकांत कांबळे, प्रा.धनंजय निंबाळकर प्रा.संग्राम थोरात यांचे  मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, संचालक, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी त्याचे अभिनंदन केले.