Thu, Apr 25, 2019 06:18होमपेज › Satara › ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांचा साताऱ्यात मोर्चा (video)

ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांचा साताऱ्यात मोर्चा (video)

Published On: Mar 20 2018 1:25PM | Last Updated: Mar 20 2018 1:25PMसातारा : प्रतिनिधी

केंद्र सरकारने तयार केलेल्या ट्रिपल तलाक विरोधात मंगळवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम पर्सनल लॉ व जमात उलमा डिस्ट्रिक्ट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

केंद्र सरकारने जे ट्रिपल तलाक बिल केले आहे, ते पूर्णपणे शरियातच्या विरोधात आहे आणि मुस्लिम महिलांचे संसार उध्दवस्त करणारे आहे. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा न करताच हे विधेयक लोकसभेत मांडले गेले आहे. त्यामुळे ट्रिपल तलाक रद्द करावा आणि शरियतमध्ये हस्तक्षेप करु नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.