Mon, Apr 22, 2019 22:20होमपेज › Satara › ग्रामपंचायत निकालानंतर विकासनगर येथे मारामारी

ग्रामपंचायत निकालानंतर विकासनगर येथे मारामारी

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्री सातच्या सुमारास विकासनगर येथे दोन गटांत मारामारी झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

खेड ग्रामपंचायतीच्या एका जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्याची मतमोजणी बुधवारी झाली. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राजेंद्र सोनटक्के हे विजयी झाले. बुधवारी रात्री विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक विकासनगर परिसरात फिरत होते. या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळण्याच्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. यात जखमी झालेले रामा भगवान कांबळे (रा. प्रतापसिंहनगर) हे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले.

त्यांनी निवडणुकीच्या वादातून शामराव माने, रोहित माने, दत्ता माने व इतरांनी अडवून गज, दांडक्याने मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचदरम्यान शामराव माने यांच्या गटातील काही जणसुद्धा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.