Fri, Jun 05, 2020 10:42होमपेज › Satara › सणासुदित भेसळखोरी बोकाळली

सणासुदित भेसळखोरी बोकाळली

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 10:19PM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी सण येत आहे. या सणासुदिच्या पार्श्वभूमीवर सातार्‍यात विविध मिठाईचे पदार्थ बनवले जात असून त्यामध्ये भेसळ केली जात आहे. त्यामुळे नारिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अन्न, औषध प्रशासन विभाग डाराडूर आहे.

गेली दोन महिन्यांपासून अन्न, औषध विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच फावले आहे. अन्न प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकार्‍यांचा भरपूर स्टाफ आहे. मात्र, त्यामानाने कारवाया होताना दिसत नाहीत. जिल्ह्याच्या पूर्वोत्तर तालुक्यांत दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. जिल्ह्यात हजारो हॉटेल्स, ढाबे आहेत. मात्र, या हॉटेल, ढाबेवाल्यांकडून शिळे अन्न वाढले जात आहे. स्वयंपाकघरात स्वच्छता राखली जात नसल्याने किळसवाणे दृश्य पहायला मिळत आहे. सातारा, महाबळेश्वर, वाई, कराड, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमध्ये भेसळखोरीने उच्छाद मांडला आहे. तरीही कारवाया होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

श्रावणमास संपल्यानंतर गणेशोत्सवही पार पडला. नवरात्रही लवकरच सुरु होत असून दिवाळी महिन्यावर येवून ठेवली आहे. अशा परिस्थितीत मिळाई दुकानांमध्ये मिठाईचे विविध पदार्थ बनवण्याची तयारी सुरु झाली. मात्र, या दुकानांमध्ये मावा, खवा आदि दुग्दजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरु आहे. सातारा बसस्थानक परिसरात मिठाई दुकानातील पेढा खाल्ल्याने काही लोकांना उल्ट्या झाला. गेल्या वर्षीच बसस्थानकासमोर एका मिठाई दुकानातील पदार्थात अळ्या सापडल्या होत्या. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. अपवाद वगळला तर अन्य अन्न सुरक्षा अधिकारी करतात काय? असा सवाल केला जात आहे. 

मिठाई दुकानांवर कारवाई केली जात नसल्याने संबंधित दुकानदार निगरगट्ट झाले आहेत. मिठाईप्रमाणेच दूध, अन्न पदार्थांत भेसळ सुरु आहे. कृत्रिम पध्दतीने पिकवल्या जाणार्‍या फळांची विक्री सुरु आहे. मात्र, याकडे अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न प्रशासन भेसळखोरांच्या मुसक्या आवळणार का? असा सवाल केला जात आहे.