Sun, Feb 17, 2019 09:08होमपेज › Satara › सातारा पालिकेवर प्रशासक नेमावा

सातारा पालिकेवर प्रशासक नेमावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा विकास आघाडीकडून भाजप नगरसेवकांची कामे अडवली जात आहेत. सत्‍ताधारी आघाडीच्या नगरसेवकांचे पालिका मिळकतीच्या माध्यमातून गैरप्रकार सुरु असून पालिकेच्या मालमत्‍तांची विभागीय चौकशी सुरु आहे. अनेक ठिकाणी चुकीची कामे केली जात असल्याने सातारा पालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी भाजपचे गटनेते धनंजय जांभळे व नगरसेविका सिध्दी पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जांभळे म्हणाले, डीपीडीसीतून 70 लाख निधी मंजूर करण्यात आला. यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलाचे रुंदीकरण करुन त्याठिकाणी बस थांबा व महिला स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडून 3 कोटी मंजूर केले. मात्र, सत्‍ताधार्‍यांकडून कामांची अडवाअडवी केली जात आहे. 

सिध्दी पवार म्हणाल्या, युनियन क्लबच्या नावाखाली बळाकावलेली पालिकेची जागा ताब्यात घेवून त्याठिकाणी स्व. गोपीनाथ मुंडे स्मृती उद्यान करणार आहे.  मात्र,  आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्‍या साविआने बागेसाठी आरक्षित असलेल्या या जागेत  खाऊगल्‍ली नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. चौपाटीवरील गरीबांची दिशाभूल केली जात आहे. राजीव गांधी बहुद्देशीय हॉलमध्ये चालणारा ‘खाजगी’ क्लास बंद करुन महिला बचतगट विक्री केंद्र झाले पाहिजे.

भाजी मंडईमधील हॉलमध्ये हेल्थ सेंटर झाले पाहिजे. सातारकरांचे हित लक्षात घेवून भाजप सरकारने सातारा पालिकेला रस्ते, हरित प्रकल्प, भुयारी गटर, घनकचरा निर्मूलन यासाठी 150 कोटींचा निधी दिला आहे. यावेळी विजय काटवटे, मिलिंद काकडे, अ‍ॅड. प्रशांत खामकर, प्राची शहाणे, रवींद्र पवार उपस्थित होते.