Sat, Feb 23, 2019 22:23होमपेज › Satara › वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणार्‍या डॉक्टरवर कारवाई 

वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणार्‍या डॉक्टरवर कारवाई 

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:27PMकराड : प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकल्याप्रकरणी कराड येथील एका डॉक्टरवर पालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली. 

जहाँगीर सय्यद असे कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. कराड पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या धडक कारवाईची शहरात चर्चा होती.

येथील मुस्लिम कब्रस्थान परिसरात कराड पालिका आरोग्य कर्मचार्‍यांना मंगळवारी वैद्यकीय कचरा आढळून आला होता. कर्मचार्‍यांनी ही बाब मुकादम मारूती काटरे यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यांनी याबाबत स्वच्छता निरीक्षक मिलिंद शिंदे यांना कळविले. आरोग्य सभापती सौ. प्रीतम यादव, मिलिंद शिंदे त्याठिकाणी गेले. घटनास्थळी सर्जिकल्स ग्लोज, इंजक्शन,  औषधांच्या बाटल्या व कागद असा कचरा आढळून आला. यात डॉ. जहाँगीर सय्यद यांच्या नावाचा उल्लेख असणारे काही कागदही आढळून आले. त्यामुळे हा कचरा डॉ. सय्यद यांच्या रुग्णालयातील असल्याचे स्पष्ट झाले. 

वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे कायद्याने गुन्हा असल्याने आरोग्य विभागाने डॉ. सय्यद यांना नोटीस बजावून दोन हजार रुपये दंड केला. या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

 

Tags : satara, karad news, medical waste, doctor, Action,