Mon, Jun 17, 2019 14:25होमपेज › Satara › बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी वरकुटे मलवडी येथे कारवाई 

बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी वरकुटे मलवडी येथे कारवाई 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:15PMम्हसवड : प्रतिनिधी

चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसावा यासाठी म्हसवडचे सपोनि मालोजीराव देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी धडक कारवाई केली. वरकुटे मलवडी येथील चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या मल्हारी मारुती चव्हाण यांच्यावर म्हसवड पोलिसांनी कारवाई करीत सुमारे 2 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत वाहतूक शाखेचे हवालदार संतोष बागल यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष बागल, पोसई बर्गे, धुमाळ, जाधव यांनी कारवाई केली. महाबळेेश्‍वरवाडी ते  वरकुटेदरम्यान चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याचे समाजल्यावरून ही कारवाई करण्यात आली. वरकुटे -महाबळेश्‍वरवाडी या रस्त्याने मल्हारी मारुती चव्हाण रा. वरकुटे-मालवडी हा त्याच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून (एमएच 10 बीएक्स 2740) चोरटी वाळू वाहतूक करताना आढळला. त्याच्यावर कारवाई करत सुमारे 2 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख हे करीत आहेत.