Wed, Nov 13, 2019 12:44होमपेज › Satara › सातारा : आमदार शशिकांत शिंदेंच्या गाडीला अपघात 

सातारा : आमदार शशिकांत शिंदेंच्या गाडीला अपघात 

Published On: Mar 04 2018 11:08PM | Last Updated: Mar 05 2018 8:48AMसातारा :  प्रतिनिधी 

आंधारी फाटा (ता. जावळी) येथे आज (रविवार) रात्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून आ. शिंदे बचावले आहेत. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकली. रात्री उशिरापर्यंत गाडी दरीतून काढण्याचे काम सुरू होते. 

आमदार मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे उपस्थित राहणार होते. रामेघर येथे जाण्यास त्यांना उशीर झाल्यामुळे त्यांची फॉर्च्युनर गाडी वेगाने निघाली होती.

वाचा : मी सुखरूप, हितचिंतकांनी काळजी करू नये : आमदार शिंदे

या मार्गावरील रस्त्याचे काम नुकतेच झालेले आहे. त्यामुळे अजूनही काही प्रमाणात खडीचे लहान तुकडे रस्त्यावर होते. त्यावरून त्यांची गाडी घसरली. गाडीचा वेग जोरात होता. त्यामुळे ती अंधारी फाट्यानजीक असणाऱ्या एका वळणावरून काही अंतर पुढे गेली. शिंदे ज्या बाजूला बसले होते, गाडीची तीच बाजू समोर असणाऱ्या एका दरीकडे गेली. मात्र, दरीच्या सुरवातीलाच असलेल्या दोन झाडांच्यामध्ये जाऊन गाडी अडकली. शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून तत्काळ उडी मारली.

याच दरम्यान सातारा नगरपालिकेतील भाजपचे गटनेते धनंजय जांभळे तेथे आले. त्यांना ओलांडूनच शिंदे यांची गाडी पुढे आली होती. अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर ते थांबले. त्यांनी तत्काळ खाली उतरुन शिंदे यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना रामेघर येथे सोडले.

इतर बातम्याः 

कोल्हापूरः कुरूंदकरच्या फार्म हाऊसवर छापा

शाळकरी मुले ओढतात ई-सिगारेटचे झुरके

'राज' की बात, भाजपला कमल हसन यांची 'हबकी' 

निरंतर तारुण्याचा ध्यास शाप की वरदान?