Wed, Jan 16, 2019 23:46होमपेज › Satara › सातारा डीवायएसपींच्या गाडीला अपघात 

सातारा डीवायएसपींच्या गाडीला अपघात 

Published On: Apr 29 2018 8:24AM | Last Updated: Apr 29 2018 8:24AMकोरेगाव : प्रतिनिधी

रहिमतपूर ते औंध मार्गावर पिंपरी फाट्यानजिक आज (दि. २९ एप्रिल)पहाटे साडे तीनच्या दरम्यान जिल्हा राञ गस्ती दरम्यान कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा जीवन कट्टे यांच्या गाडीला  अपघात झाला. अपघातामध्ये त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना सातारा येथील सातारा डायग्नोस्टीक रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताचे नेमके कारण समजले नाही. प्रेरणा कट्टे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

Tags : Accident, Satara, DYSP, rahimatpur ondh rood