होमपेज › Satara › आधार-पॅन लिंकने अनेकांची भंबेरी

आधार-पॅन लिंकने अनेकांची भंबेरी

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:15PMसातारा : योगेश चौगुले

बँक खात्याला आधार लिंक, केवायसी यासह अनेक ठिकाणी शासनाने आधार लिंक करण्याचा फतवा काढला आहे. काळ्या पैशाला आळा घालण्याबरोबरच इन्कमटॅक्सवरही नजर ठेवली जात आहे. याकरता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वाढवून दिलेली मुदत शनिवारी संपत आल्याने ती कनेक्ट करण्यासाठी शनिवारी दिवसभर संबंधितांची धावपळ झाली. ही लिंक न दिल्यास पाच हजार रुपये दंड होणार असल्याने अनेकांची भंबेरी उडाली.

तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकर करा. कारण लिंक करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून  असल्याचे वृत्त पाहताच शनिवारी अनेकांची भंबेरी उडाली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी वाढवून दिलेली मुदत संपत आली आहे. आतापर्यंत ही मुदत चार वेळा वाढवली आहे. सरकारने आधार कार्डला पॅनकार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. 

अनेकांनी ऑनलाईन संकेतस्थाळावरुन तर काहींनी मेसेजच्या माध्यामातून लिंक करण्याचा प्रयत्न केला. दि.30 जून रोजी मुदत संपल्याने आयकर विभागाचे संकेतस्थळही मंदगतीने काम करत होते. मात्र, पाच हजार रुपये दंडापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकांनी तासनतास बसून अखेर आधार व पॅन कार्ड लिंक केले. 

आयकर विभागाच्या ुुु.ळपलेाशींरुळपवळरशषळश्रळपस.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जावून  अकाऊंट तयार नसेल तर रजिस्ट्रेेशन केले. त्यानंतर लॉगईन केल्यावर प्रोफाईल सेटींग या पर्यायाची निवड करुन आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा पर्याय निवडला. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर आणि इतर माहिती सबमिट करुन आधार व पॅनकार्डची लिंक करण्यात आली. काहींनी मोबाईलवरुनही लिंक केली. मोबाईवरुन मेसेज पाठवूनही आधार-पॅन लिंक करता येत होते. त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर  आधार क्रमांकपॅनकार्ड क्रमांक असा मेसेज पाठवावा लागत होता. पॅनकार्ड आधारकार्डशी जोडले नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. तसेच कर परतावा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकांनी ही लिंक केली आहे.