होमपेज › Satara › ट्रेलर व कंटेनर अपघातात एक गंभीर

ट्रेलर व कंटेनर अपघातात एक गंभीर

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:24PMओझर्डे : वार्ताहर

पुणे-सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला उतारावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरची दोन कंटेनरला जोराची धडक बसली. या तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातातील ट्रेलर चालकाने वाहनासह पोबारा केला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुणे सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या तीव्र उताराने (क्र. एम एच 12  एम बी 3404) या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर (क्र. एम एच 04 एफ जे 9605) ला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत हा कंटेनर रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनर (क्र. के ये 01 ए जी 7707) ला जाऊन धडकला. या तिहेरी अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. त्याचे नाव समजू शकले नाही. त्याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.