Wed, May 27, 2020 08:28होमपेज › Satara › जे गाव स्वच्छ असते त्या गावातील नागरिकांचे मनही स्वच्छ राहते (video)

जे गाव स्वच्छ असते त्या गावातील नागरिकांचे मनही स्वच्छ राहते (video)

Last Updated: Mar 03 2020 10:56AM
कुडाळ (सातारा) : पुढारी ऑनलाईन

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जावळी तालुक्यातील कुडाळ येथे आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ज्या गावांमध्ये स्वच्छता असते त्या गावातील नागरिकांचे मनही स्वच्छ राहतात हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून जावळी तालुक्यातील कुडाळ येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

अधिक वाचा : कोयनेत ७५.७० टीएमसी पाणीसाठा

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संपूर्ण ग्रामस्थ एकत्र आले आणि संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. प्रत्येकाने हातामध्ये झाडू घेऊन आपला परिसर आपला विभाग स्वच्छ केला. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता आपला गाव हेच आपलं घर असे समजून संपूर्ण गाव स्वच्छ राहिले पाहिजे हा संदेश या निमित्ताने स्वच्छता करणाऱ्या नागरिकांना देण्यात आला. 

अधिक वाचा : शासकीय कर्मचार्‍यांचा पहिला दिवस आळसवाणा

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच गणपत कुंभार, महेश पवार, पिंपळबन  समितीचे सदस्य याचबरोबर अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.