होमपेज › Satara › दुचाकी वाहन क्रमांकासाठी

दुचाकी वाहन क्रमांकासाठी

Published On: Mar 13 2018 1:44AM | Last Updated: Mar 12 2018 8:07PMआरटीओतर्फे नवीन मालिकासातारा : प्रतिनिधी

आरटीओच्या वतीने सातारा जिल्ह्यात दुचाकी वाहन क्रमांकासाठी एमएच 11 सीएन ही नवी मालिका दि. 13 पासून सुरू होत आहे. वाहनास आकर्षक क्रमांक घ्यावयाचे आहेत त्यांनी आकर्षक क्रमांक फी भरुन नंबर आरक्षित करायचे असून दुचाकी मालिकेतील क्रमांक चारचाकीसाठी हवा असेल तर नियमानुसार तिप्पट फी आकारली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे. 

क्रमांक मालिका सुरू झाल्यानंतर प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहेत, अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय वाहन 4.0 या प्रणालीवर देण्यात येत असल्याने अर्जांसोबत वाहनधारकांचा वैध ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, पिन कोड नंबर देणे बंधनकारक आहे. दि. 13 रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते 12 पर्यंत विहित शुल्काचे डीडी अर्जासोबत स्वीकारले जातील. एकाच क्रमांकासाठी जादा अर्ज आल्यास अर्जदारांना दुसर्‍या दिवशी दुपारी एकपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे डीडी बंद लिफाफ्यात सादर करावे, जो जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल, त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरितांना धनाकर्ष परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 30 दिवसांत नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती धायगुडे यांनी दिली.