Tue, Jan 22, 2019 04:10होमपेज › Satara › सातारा : भोंदू हैदरअलीचा जादूटोणा, नव्हे हा तर क्रुरपणा

सातारा : भोंदू हैदरअलीचा जादूटोणा, नव्हे हा तर क्रुरपणा

Published On: Jan 17 2018 4:54PM | Last Updated: Jan 17 2018 4:54PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

सातार्‍यातील हैदरअली शेख  (रा. गुरुवार पेठ) या भोंदू बाबाचा जादूटोणाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.  आजारी असणार्‍या महिलेला भूतबाधा झाली असल्याचे खोटे सांगून तिच्यावर 2008 पासून बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करताना त्याने मोबाईलवर शुटींग केले. आणि तिच्याकडून 30 तोळे सोनेही जबरदस्तीने घेऊन तिच्या पतीला तलाक घ्यायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. क्रूरपध्दतीने केलेल्या या प्रकरणाची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सध्या हैदरअली पुणे येथील बलात्कार व जादूटोणाप्रकरणी अटकेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणातील तक्रार महिला ही 38 वर्षीय आहे. 1996 साली तिचा विवाह झाला असून सांगली जिल्ह्यातील सासरवाडी आहे. महिलेला दोन मुले झाल्यानंतर 2007 साली तिची प्रकृती बिघाडल्याने दवाखान्यात दाखवले मात्र तब्येत सुधारली नाही. 2008 मध्ये सातार्‍यातील माहेरी आल्यानंतर महिलेच्या भावाने हैदरअली याच्याकडे नेले. हैदरअली याने पाहिल्यानंतर महिलेची सर्व माहिती घेतली व तिला भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. भूतबाधा उतरण्यासाठी दोन दिवस मंत्र-तंत्र उपचार करावे लागतील असेही सांगितले.

महिलेला उपचारासाठी दुसर्‍यांदा घेऊन गेल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींना बाहेर जाण्यास सांगितले. याचवेळी भोंदू हैदरअली याने महिलेला गुंगीचे औषध देवून तिला विवस्त्र करुन बलात्कार करत त्याने मोबाईलमध्ये शुटींग केले. महिला शुध्दीवर आल्यानंतर हैदरअलीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली व या घटनेबाबत कोणाला काहीही न सांगण्यास सांगितले. याबाबत वाच्यता केल्यास बलात्कार केलेले शुटींग सर्वांना दाखवण्याची धमकी दिली.