Sun, Jul 12, 2020 15:19होमपेज › Satara › दरोड्यातील ९ तोळे सोने हस्तगत

दरोड्यातील ९ तोळे सोने हस्तगत

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:39PM

बुकमार्क करा

उंब्रज : प्रतिनिधी

उंब्रज (ता. कराड) येथील  दरोड्यातील तपासाच्या अनुषंगाने श्रीगोंदा येथे गेलेल्या उंब्रज पोलिसांच्या पथकाने एकूण 47 तोळे ऐवजापैकी साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. दरोडेखोरांनी गुन्ह्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड (मेक), पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

शशिकांत ऊर्फ काळ्या दप्तर्‍या ऊर्फ दत्तू भोसले (वय 38, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. नगर), अतुल दप्तर्‍या ऊर्फ दत्तू भोसले (23, रा. वलगुड, ता. श्रीगोंदा), अरुण दशरथ चव्हाण (रा. पद्यपूरवाडी, ता. व जि. नगर), देवराम गुलाब घोगरे (36, रा. मांडवगण - मांडूळवाडी, ता. श्रीगोंदा) या दरोडेखोरांना उंब्रज पोलिसांनी अटक केली आहे. उंब्रज पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी काळ्या ऊर्फ शशिकांत भोसले हा टोळीचा प्रमुख असून, तपासातील महत्त्वाचे धागेदोरे मिळावेत व चोरलेला ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी त्याला श्रीगोंदा येथे अधिक तपासासाठी नेले होते.

यावेळी त्याने राहत्या घरासमोर काही अंतरावरील शेतजमिनीतील घासगवताच्या बुडक्याला ठेवलेले सुमारे साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (तीन  तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन चैन, अडीच तोळे वजनाचा एक हार, एक तोळे सोन्याची अंगठी) पोलिसांना काढून दिले. तर गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला आहे.  श्रीगोंदा येथे गेलेल्या पथकात पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, हेड कॉन्स्टेबल सतिश मयेकर, पोलिस नाईक लक्ष्मण जगधने, कॉन्स्टेबल आण्णा मारेकर, फडतरे महिला कॉन्स्टेबल अश्‍विनी थोरवडे यांचा  सहभाग होता.